Monday, November 24, 2008

निसर्गात हरवून जाण्यासाठी

शुभ्र तरल धुक्याखाली
हिरव्या गार वृक्षांचा डेरा
एकांत पाऊलवाटेवर 
चिंब भिजलेला पाचोळा
मातीचा मंद गंध
अन् धुंद गार ओलावा
अशातून मी एकटीच
चालतेय माझ्याच तंद्रीत

कधी कधी हा एकटेपणा
हवाहवासा वाटतो
पण मन घाबरतं
म्हणून सर्वांबरोबर असून
एकटं रहावसं वाटतं
हे सुखद अनु्भव घेण्यासाठी
निसर्गात हरवून जाण्यासाठी

1 comment:

शब्दबंध said...

स.न.वि.वि.
आपला ब्लॉग अत्ताच वाचला. छान आहे. "शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ब्लॉगवरील पोस्टांच्या अभिवाचनाची ई-सभा नुकतीच पार पडली. अधिक माहिती http://marathi-e-sabha.blogspot.com/ येथे आहे.
पुढल्या शब्दबंधमध्ये आपला सहभाग अपेक्षित आहे.
धन्यवाद.