Thursday, July 10, 2008

मनातला कोलाहल

मनातला कोलाहल
डोळ्यातूनच झिरपुदे
डोळ्यांच्या गंगाजलात
त्याचे निर्माल्य होऊ दे

ती जखम

ती जखम भळभळतच आहे

"त्याची" उघड्या कपाळावर

आमची मनात खोलवर

वेळूच्या बनात

वेळूच्या बनात

शीळ वारय़ाने घातली

थरथरले नुपूर

सय "निळ्याची" दाटली!

Sunday, July 6, 2008

एक दिवस असाच...

एक दिवस असाच...
ओला चिंब निथळणारा
हिरवागार गंधभरला

एक दिवस असाच...
आळसावलेला सुस्तावलेला
सूर्य ढगाआड विसावलेला

एक दिवस असाच...
सकाळ होऊनही न उजाडलेला
रात्रीच्या कुशीत गुरफटलेला...

एक अथांग जलाशय

एक अथांग जलाशय
पाण्यावर उमटणारे तरंग
आभाळात ढगांचे पुंजके
त्यावर उडणारे विहंग

शांत निर्मळ आसमंत
वारय़ाची झुळुक आळसावलेली
लांब सावल्या पसरलेल्या
पृथ्वीची फेरी संपत आलेली...